जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा बँकेची निवडणूक सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून लढण्यावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांचे एकमत झाले आहे.
आज झालेल्या सर्वपक्षीय पहिल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांचे 8 सदस्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिटीत शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर आणि काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व ऍड. संदीप पाटील यांचा समावेश आहे.
आता पुढच्या बैठकांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीनंतर देण्यात आली.