जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने महाराष्ट्रात जिल्हा, तालुका आणि गाव पातळी पर्यंत पक्ष संघटनेच्या कार्यप्रणालीची समीक्षा करून आढावा घेण्यासाठी व जळगाव जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिति समजून घेण्यासाठी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न होणार आहे.

दि. 31/ 08/ 2021 मंगळवार रोजी सकाळी 10:00 वाजता तेली समाज मंगल कार्यालय भुसावळ येथे प्रहार जनशक्ती पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. तरी सर्व जळगाव जिल्ह्याचे शहर आणि तालुक्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्षअनिल चौधरी यांनी केले आहे. दिलेल्या वेळेत जळगाव जिल्हातील तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.