रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय जनता पार्टी रावेर तालुक्याच्या वतीने श्री शनिमंदिर व महादेव मंदिर रावेर येथे मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद व शंखनाद आंदोलने करण्यात आले. लाखो लोकांची उपजीविका धार्मिक स्थळांवर मंदिरांवर अवलंबून आहे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे राज्य सरकार त्यांना आर्थिक मदत सुद्धा करत नाही व मंदिरे सुद्धा उघडी करत नाही देशातील अन्य राज्यातील मंदिरे याआधीच उघडी करण्यात आली आहे परंतु राज्यातील देव धर्म विरोधी आघाडी सरकारने त्यावर कुठल्याही कार्यवाही केलेनाही व भक्तांसाठी मंदिरे खुले केली नाही त्यासाठी कुंभकर्णपेक्षा गाढ झोपलेल्या ठाकरे सरकार ला इशारा देण्यासाठी रावेर ता.भारतीय जनता पार्टी व आध्यात्मिक आघाडी तर्फे दार उघडा उध्ववा दार उघड अशी हाक देवून घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा जळगाव जि.उपाध्यक्ष पद्माकर महाजन,जि.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,ता.अध्यक्ष राजन लासुरकर, कु.उ.बा.समिती माजी सभापती श्रीकांत महाजन,प.स.माजी उपभापती.जुम्मा तडवी,प.स.सदस्य योगिताताई वानखेडे,जि.यु.मो.उपाध्यक्ष अमोल पाटील, रावेर शहर अध्यक्ष दिलीप पाटील,आध्यात्मिक आघाडी ता. अध्यक्ष संतोष महाराज, मा.अध्यक्ष सुनील पाटील,संदिप सावळे,प्रविण पाचपोहे वकील आ.अध्यक्ष सुर्यकांत देशमुख,माजी शहर अध्यक्ष मनोज श्रावगे तसेच पदअधिकारी व कार्यकर्तं उपस्थित होते .