जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी महानगर च्या वतीने पास झालेल्या आंदोलनाचे चांगलेच पडसाद उमटले आहे. आयुक्त सतीश कुलकर्णी महापौर जयश्री महाजन यांनी पंधरा दिवसात शहराचे रस्ते दुरुस्तीला सुरुवात होईल असे आश्वासन दिले आहे, मात्र पंधरा दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यास महापालिकेला कुलूप लावण्यात येईल असा अल्टिमेट राष्ट्रवादी महानगर चे अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे.
जळगाव शहरातील झालेल्या रस्त्यांची भीषण अवस्था तसेच पावसामुळे झालेले संपूर्ण चिखल यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक हे सगळ मुकाट्याने सहन करीत आहे मात्र महापालिका अद्याप पर्यंत रस्त्यांची समस्या सोडवायला तयार नाही, अथवा रस्त्यात पडलेले खड्डे देखील बुजवायला तयार नाही त्यामुळे आज राष्ट्रवादी महानगर च्या वतीने महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
जळगाव शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेचे विकास कामे तसेच मलनिस्सारण योजनेची काम यामुळे ठिकाणी रस्ते खोदले जात आहे यामुळे संपूर्ण रस्त्यांवर खड्डे झाले आहेत मात्र हे खड्डे बुजवले जात नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. मनपा मध्ये तक्रार देऊन देखील कोणीच लक्ष देण्यास तयार नाही, त्यामुळे नागरिकांचा रोज किती वाढला आहे. हाच कळीचा मुद्दा करून आज राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा मनपावर काढण्यात आला.
राष्ट्रवादी महानगर च्या वतीने संपूर्ण महापालिका परिसर घोषणांनी दणाणून सोडला त्यावेळी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शहराची झालेल्या अवस्थेवरून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली मात्र वेळीच आयुक्त कुलकर्णी हे महापालिकेच्या आवारात येत आंदोलकांचे निवेदन त्यांनी स्वीकारले एवढी आंदोलकांनी आश्वासन न देता लेखी आदेश द्यावे अशी देखील मागणी यावेळी केली मात्र महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या समजुती नंतर आंदोलकांना पंधरा दिवसात दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यासाठी टेंडर प्रक्रिया देखील राबविण्यात येत असल्याचे आयुक्तांकडून आहे.