जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसापासून ईडी तसेच सीडी चे राजकारण संपूर्ण राज्यात गाजत असताना जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने आज माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन हे अनेक दिवसा नंतर सोबत चर्चा करताना दिसून आले निमित्त होते जिल्हा बँक निवडणुकीचे, सर्व पक्षीय निवडणूक व्हावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रयत्नशील आहेत, त्यांच्याच प्रयत्नामुळे दोन दिग्गज ईडी, सीडी आले नेते कडवट राजकीय संघर्ष पेटला असताना सोबत आल्याचे पाहायला मिळाले आहे.
या बैठकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र नुकतेच भाजप नेते महाजन यांनी खडसे यांना ” ईडी तर लावली आता तुम्ही सीडी दाखवा..” असे खुले आव्हान केले वर्षभरापासून सुरू असलेल्या एकमेका च्या टीका टिप्पणी नंतर प्रथमच महाजन आणि खडसे एकत्र पाहायला मिळाले आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मागे भाजपवाल्यांनी ईडी चे कुऱ्हाड लावले असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जाहीर रीत्या सांगण्यात येते यावरून राष्ट्रवादीच्या बैठकीत खडसे यांनी देखील भाजपवर हल्लाबोल करीत किती छढायचे ते छडा मात्र मी झोकणार नाही.. रोखणार नाही.. मी मजबूत आहे ..असे विधान केले या कारवाईला आतापर्यंत सामोरे गेलो.. मात्र हेतु पुरस्कर ईडी ची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप माजी मंत्री खडसे यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्याचा धबधबा संपूर्ण राज्यात असताना मात्र या दोन नेत्यांच्या राजकीय संघर्षामुळे अनेक विकास कामांवर परिणाम होत आहे. सामान्य जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन देखील या सर्व घटनेमुळे बदलला आहे. राज्य पातळीवरील नेते जळगाव जिल्ह्यात असताना विकास कामात जिल्ह्याची उपेक्षाच राहिली, मैत्रीचे असे पाऊल कोणीही उचलायला तयार नाही आज मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय निवडणुकी निमित्तानं खडसे व महाजनांना एकत्र आणण्याचे कसब दाखवून दिले.
बीएचआर प्रकरणामुळे गिरीश महाजन, नाथा भाऊ खडसे यांच्या निकटवर्तीयांना जेल वारी करावी लागली आहे, या प्रकरणाचा पाठपुरावा खडसे यांनी जाहीररित्या केल्याचे बोलून दाखवले बीएचआर प्रकरणाचा थेट एका माजी मंत्र्याशी संबंध असल्याचे त्यांनी सांगितले होते त्याचा थेट इशारा महाजन यांच्याकडे असल्याचे दिसून आले यामुळे राजकीय हितसंबंधात आणखी दुरावा निर्माण झाल्याचे त्यांचे नजीकचे कार्यकर्ते सांगतात.
खडसे यांनी बीएचआर प्रकरणाचा पाठपुरावा केल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या परिवाराच्या मागे देखील ईडी चा ससेमिरा सुरू झाला भोसरी येथील एमआयडीसी च्या जमीन प्रकरणात मनी लॉन्ड्री झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले जावई गिरीश चौधरी यांनी एकतीस कोटीची मालमत्ता तीन कोटी रुपयात कशी खरेदी केली असे आरोप करण्यात आले. खडसे यांच्या पत्नी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्या नावावर भोसरीतील ती मालमत्ता आहे, ईडीने त्यांना नोटीस पाठवीत चौकशी करीता उपस्थित राहण्याचे सांगितले आहे मात्र पंधरा दिवसाची वेळ मागून चौकशी तूर्तास टाळली आहे.