जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार भाजप नेते चंदुलाल पटेल यांच्या स्थानिक विकास निधी मधून कोट्यवधीच्या कामांना सुरुवात होणार आहे, गेल्या काळातील कायदेशीर लढाईनंतर विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल जनमानसाच्या पुन्हा हजर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यात खुंटलेला विकास यासाठी ते पुढाकार घेणार आहेत अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी देखील येण्याची दाट शक्यता भाजप सूत्रांनी वर्तवली आहे.
भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात आतापर्यंत महाजन यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत गेल्या काळात भाजपला मिळालेले यश यामध्ये नियोजन बद्दल कार्य ही त्यांची जमेची बाजू आहे.जिल्हा भाजप मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर संघटनात्मक मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे विधानपरिषदेचे आमदार असल्याने संपूर्ण जिल्हा त्यांच्या कार्यकक्षेत आहे. यामुळे भाजपकडून त्यांच्याकडे देण्यात येणार्या जबाबदारीची चाचपणी सध्या सुरू आहे.
विधान परिषदेच्या कार्यकाळात स्थानिक आमदार निधी मधून कोविड बाधित रुग्णांना लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा शासनाच्या वतीने उपलब्ध करण्यात आल्या होत्या, जिल्ह्यातील कोविड रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी विकास कामांवर आलेला निधी हा आरोग्य क्षेत्रात खर्ची केला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सर्वाधिक निधी खर्च करण्यात येणार असल्याचा नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्या कडून देण्यात आली आहे.