मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उमेदवारीला आता प्रचंड विरोध होताना पहायला मिळत आहे, राज्यपाल नियुक्ती करिता राष्ट्रवादीकडून खडसे यांचे नाव पाठवण्यात आलेले आहे. बारा नावांची यादी खडसे यांचे नाव आघाडीवर आहे मात्र त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार की देऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे केली आहे, खडसे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मोठा भ्रष्टाचार केला असून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात अथवा आमदारकी देणं उचित राहणार नसल्याचे अंजली दमानिया यांनीम्हटले आहे.
राज्यपाल यांच्याकडे आणखी काही पुरावे मी देणार असून यापूर्वी देखील राज्यपालांच्या भेटीमध्ये काही कागदपत्रे दिलेली आहेत. राष्ट्रवादीकडून खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी येणे हे दुर्दैवी आहे. खडसेंसारखे नेते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले तर याला काहीच अर्थ राहणार नाही असे विधान देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे दमानिया यांनी नुकतीच राजभवनात जाऊन राज्यपाल यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी प्रवेशावेळी माजी मंत्री खडसे यांनी जे शब्द वापरले यासंदर्भात राज्यपाल यांना निवेदन दिले आहे. यामध्ये खडसे यांच्या भाषणात बाई दिली नाही तर लावली गेली असे विधान शरद पवार, खा.सुप्रिया सुळे गृहमंत्री अनिल देशमुख असताना केले गेले या विधानानंतर मी शरद पवार, सुप्रिया सुळे यांना फोन कॉल वर मेसेज केला होता, यावरून शरद पवार यांचा मला फोन आला होता त्यांनी फोनवर बोलताना खडसे यांनी तुमचे नाव घेतलेले नाही मी त्यांना सांगितलं… माझं सोडा पण.. अशापद्धतीने खडसे यांनी कोणत्याही बाई बद्दल असे विधान करणे योग्य आहे का? … असा सवाल देखील शरद पवार यांना केल्याचे अंजली दमानिया यांनी माध्यमांत समोर सांगितले. तसेच आज गायत एकनाथराव खडसे यांच्या विरोधात पोलिसात अनेक वेळा तक्रारी करून देखील त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही यापुढे न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे तत्पूर्वी राज्यपाल महोदयांची भेट घेऊन त्यांना काही कागदपत्रे सुपृद केली आहे.