जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसा निमित्ताने ईडी च्या कारवाई संदर्भात पुन्हा जाहीर वक्तव्य केल आहे. वेगवेगळ्या माध्यमातून अडवणूक सुरू असून दडपण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मी कोणत्याही दडपणाला बळी न पडता सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. खडसे यांचा 70 व्या वर्षात पदार्पण करीत असून वा
वाढदिवस मोठ्या जल्लोषात जळगाव जिल्ह्यात साजरा होतो. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे एका कार्यक्रमाप्रसंगी माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली असता खडसे व्यक्त झाले.
खडसे हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते असून ओबीसी समाजातील मोठा चेहरा आहे, भाजपमध्ये असताना अनेक चौकशा त्यांच्या सुरू होत्या अनेक आरोप देखील त्यांच्यावर झाले मात्र समित्यांच्या माध्यमातून त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती राष्ट्रवादी प्रवेश होताच त्यांच्यामागे किडीचा ससेमिरा सुरू झाला पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली मात्र “नाथा भाऊ आणि कार्यकर्ता ” हे समीकरण मजबूत असल्याने आज देखील खडसे यांचा राजकीय संघर्ष सुरू असल्याचे खडसे यांनी आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्ताने बोलून दाखवले आहे.
खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, मी झुकणार नाही.. वाकणार नाही.. मी ..मजबूत आहे.. कोणी कितीही छळ केला तरी मी घाबरणार नाही..असे फुर्ती दायक विधान कार्यकर्त्यांना उद्देशून केले आहे. ईडी ची कारवाई तसेच अनेक शारीरिक वेदनांशी सध्या खडसे झुंज देत आहेत. जाहीररीत्या खडसे हे ईडी च्या कारवाई बद्दल नाराजी व्यक्त करताना दिसून येतात जर मी काहीच केलेले नाही तर घाबरू कशाला..असा ठाम विश्वास नाथाभाऊ खडसे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त केला आहे.