रावेर येथे माउली हॉस्पीटलचा अभिनव उपक्रम “एक बाळ – एक झाड”
रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | रावेर येथील माउली फौंडेशन व हॉस्पीटल कडून राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड उपक्रमाची चळवळ उभी राहून तालुक्यातील वृक्ष संवर्धनाला नवीन दिशा मिळावी असे प्रतिपादन फैजपूर येथील उप विभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी रावेर येथे माउली हॉस्पीटल येथे एक बाळ – एक झाड हि योजना सुरु करण्यात आली असून शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ संदीप पाटील यांनी सांगितले की, बाल जन्माला आल्या नंतर दवाखान्यातून घरी जातांना पालकांना एक रोप मोफत देण्यात येईल त्याचे वृक्षारोपण त्यांनी कौटुंबिक फोटो काढून पाठवावा त्या वृक्षाला आपल्या बालळाचेच नाव देवून आपल्या बाळाच्या काळजी प्रमाणे त्या झाडाची निगा राखावी म्हणजे आपल्या बाळासाठी ऑक्सिजन ची व्यवस्थाच जणू आपण केल्याची भावना राहील
यांनतर रावेर वन परिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि, वन विभागाकडून सुकन्या योजना सुरु असून वृक्षारोपण आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहे. या उपक्रमाला लागणारी मदद मी केव्हाही करण्यास तयार आहे. रावेर तालुक्यात जंगल आहे. त्याला सांभाळून त्यात वाढ करणे आपली जबाबदारी आहे भविष्यात गत काळातील भयावह परिस्थिती येणार नाही यासाठी वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे.
पो.नि. कैलास नागरे यांनी भाषणात सांगितले की, कोरोना काळात सर्व नागरिकांनी ऑक्सिजन पुरवठा तुटवडा अनुभवला आहे. झाडांचे महत्व आपण ओळखले आहे. आपल्या बाळाच्या भविष्यासाठी आपण त्याचे आरोग्य सांभाळत असतांना त्याच्या सुकर आयुष्यासाठी झाड लावलेच पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गजाला तबस्सुम कमालोद्दिन यांनी केले तर आभार दीपक नगरे यांनी मानले. प्रमुख उपस्थित कमालोद्दिन सर, व्यंकटेश ट्रेडर्स संचालक ललित चौधरी, भंगाळे ट्रेडर्सचे संचालक राजेश भंगाळे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश राजपूत, विजय पाटील, नदीम खान, योगेश कुलकर्णी, ईश्वर महाजन, युवराज मिस्तरी, जतीन पाटील, गौरव पाटील, राहुल पाटील, जुबेर खान, भूषण पाटील, मीना शर्मा, उषा चौधरी, गायत्री महाजन, भूषण तायडे, सोनम पवार, स्वाती सोनार, सीमा तायडे आदींनी परिश्रम घेतले.