जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भाजपा अनुसूचित जाती मोर्चा (जळगाव ग्रामीण) ची जिल्हा बैठक ब्राम्हण सभा सभागृहात आयोजित केली होती. यावेळी विचार मांडताना ते बोलत होते. पुढे बोलतांना राजूमामा म्हणाले की, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव जिल्ह्यात बळकट करण्यासाठी व प्रदेश अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मा.आं.श्री.सुधाकर भालेराव यांचा नाशिक विभागीय दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा पदाधिकारी, अनुसूचित जाती मोर्चा सर्व मंडल अध्यक्ष यांनी प्रयत्न करावे. त्यासाठी जी मदत लागेल ती करण्यास मी तयार आहे. असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
विकास वामन अवसरमल अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष जळगाव ग्रामीण यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना सांगितले अनुसूचित जाती मधील सर्व जाती मिळून हा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा आपली वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा पदाधिकारी यांनी मंडलानुसार प्रभारी नेमण्यात आले आहे. तसेच मंडल अध्यक्ष सर्व मंडल अनुसूचित जाती मोर्चा यांनी आपल्या मंडल कार्यकारणी तयार कराव्या. तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ.सुधाकर भालेराव यांनी बोलाविलेल्या नाशिक विभागीय मेळाव्यास अनुसूचित जाती मोर्चाच्या जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहावे. व केंद्र सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे.
जिल्हा उपाध्यक्ष भाजपा जळगाव जिल्हा मा.पी.सी.आबा यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी संपूर्ण जिल्हाभरात दौरा आयोजित करून अनुसूचित जाती मोर्चा बळकट करावा. पाहिजे त्या ठिकाणी भाजपा जिल्हा पदाधिकाऱ्यांची मदत घ्यावी.भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा बैठकीत समर्थ बूथ संपर्क अभियान यावर व संघटनात्मक बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली, तसेच इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्रथम भारतमातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील दिवंगत झालेले भाजपा कार्यकर्ते, देशासाठी शहीद झालेले जवान, चाळीसगाव येथे महापुरात मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हापरिषद अध्यक्षा मा.ना.सौ.रंजनाताई प्रल्हाद पाटील, मा.सुबोध वाघमारे, प्रफुल्ल जवरे, अनंतराव नन्नवरे, धनराज बाविस्कर, मिलिंद भैसे, प्रमोद वानखेडे, विलास अवसरमल, राहुल तायडे, अमोल घोडे, प्रा.विलास भालेराव, अभिषेख मोरे, दिलीप सुरवाडे, रवींद्र दाभाडे, दीपक बोरोले, निखील सुभाष सावळे, दीपक हरी सोनवणे, राजेंद्र सवळे (प.स.सदस्य), दीपक सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, धर्मराज बागुल, विजय जाधव
यांच्यासह भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव ग्रामीण सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती मोर्चा मंडल अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.बैठकीचे सूत्र संचालन प्रशांतजी निकम यांनी केले. तर आभार नागेश्वरजी साळवे यांनी व्यक्त केले. तर बैठक यशस्वी करण्यासाठी भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख मा.श्री.गणेश माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.