जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ओबीसी आरक्षण धोरणावरून सध्या राज्यात विविध शाब्दिक चकमक उडत आहे. महा विकास आघाडीची भूमिका आज नामदार जयंत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी स्पष्ट केले आहे निवडणुकांपूर्वी ओबीसी आरक्षण जाहीर व्हावे हीच महाविकास आघाडीची भूमिका असून यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे ओबीसी आरक्षणाबाबत ना. पाटील यांनी सांगितले आहे.
ना. जयंत राव पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून चाळीसगाव तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत आहे या दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीची ओबीसी आरक्षणासंदर्भातील भूमिका मांडली आहे जिल्ह्यातील राष्ट्रवादीत सुरु असलेल्या गटबाजी बाबत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिले आहे.
ओबीसी आरक्षण वरून संपूर्ण राज्यात आंदोलने करण्यात येत आहे. ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी सरकारवर केला होता याबाबत प्रथमच जयंतराव पाटील यांनी निवडणुकांपूर्वीच ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात येईल हीच आमची भूमिका आहे असे सांगितले आहे.
ओबीसी आरक्षण वरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भूमिका जाहीर करत स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय निवडणुका घेण्यात येऊन आहे अन्यथा सरकार विरुद्ध संघर्ष उभा करण्यात येईल असे देखील ठामपणे सांगितले आहे.