जामोद ता. जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | येथे जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील द्वार दर्शनाला गेले असता गावातील व आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी, सरपंच यांनी वेळोवेळी एसटी डेपोला पत्र दिले होते, एसटी बस बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. जास्त भाडे खर्च करून अवेळी धावणाऱ्या खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागत आहे. असे गाऱ्हाणे मांडले. याबाबत तत्काळ जळगाव डेपो मॅनेजर यांना फोन लावून विचारपूस केली असता, रस्त्याची खराब असल्याकारणाने बस येऊ शकत नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यासाठी पालक मंत्री पाटील यांनी तत्काळ जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांना सूचना देऊन स्वखर्चाने जेसीबी व मुरूम उपलब्ध करून दिलेला आहे व बंद एसटी सुद्धा लगेच सुरू करण्यात येईल असे आश्वासित केले. याप्रसंगी जामोद गावाचे समाधान पाटील, गुलाबअण्णा भिमराव पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, धनराज पाटील, पळसोदचे सरपंच पंकज पाटील, योगराज पाटील, आमोदाचे बाळु अहिरे, ईश्वर सुर्यवंशी, नाना पाटील, गाढोदाचे प्रविण पाटील, बाळु पाटील तात्या सिताराम पाटील व ग्रामस्थ उपस्थित आहे.