मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या विरोधात ईडीने शुक्रवारी भोसरी येथील जमीन या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले या प्रकरणातील संबंधित चौधरी यांना सात जुलै रोजी अटक केली होती खडसे कुटुंबाचे वकील मोहन टेकावडे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल आहे मी अद्याप आरोपपत्र पाहिलेले नाही त्याचा अभ्यास केल्यानंतरच प्रतिक्रिया देईल असे वक्तव्य त्यांनी केले.
भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे खडसे यांच्या अडचणीत अधिक वाढ झालेली आहे त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह दोघांविरोधात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेला आहे.
ईडी कडून अद्याप पर्यंत सविस्तर खुलासा याबाबत आलेला नसला तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढे खडसे यांच्याविरोधात न्यायालयात मनी लॉन्ड्रिंग तसेच झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी खटल्याचे कामकाज सुरू होणार आहे, खडसे यांचे जावई अद्यापपर्यंत न्यायालयीन कस्टडीत आहे. त्यांच्या जामीन अर्जावर नुकतेच कामकाज झाले होते मात्र कायदेशीर बाबी पुढे करीत युक्तिवाद करण्यात आला होता यावरून गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.