जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसापासून राज्यपाल नियुक्त आमदार की वरून संपूर्ण राज्यभरात संभ्रम निर्माण झालेला आहे राष्ट्रवादीने उमेदवारांची दिलेली नावांवर राज्यपालांनी आक्षेप घेत काही नाव वगळण्याचे सांगितले आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल राजकीय खेळी करीत असल्याचे आरोप केले होते. नेमकं ठराविक गावांनाच विरोध असल्याने यामध्ये यामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव असण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात देखील आल्याचे सांगितले जात आहे मात्र राष्ट्रवादीने राजकीय डावपेच खेळत पर्यायी उमेदवारांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खडसे यांच्या जागेवर त्यांच्या कन्या जिल्हा बँकेचे चेअरमन ऍड. रोहिणी खडसे यांचे नाव राष्ट्रवादी देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे.
विधानपरिषदेवर आमदार नियुक्तीच्या राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर आज राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन चेंडू टाकल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे एकनाथ खडसे यांच्या नावाला जर राज्यपालांनी आक्षेप घेतला तर ऐन वेळेस जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रोहिनी खडसे हे यांचे नाव सुचवण्यात येणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळल्यामुळे राजकीय परिस्थिती बदलली आहे. याची जाणीव ठेवून राष्ट्रवादीने नवीन राजकीय खेळी केली आहे. एकनाथ खडसे यांच्या मागे सध्या राज्यात ईडीची चौकशी सुरू आहे हे लक्षात घेऊन त्यांचे नाव बदलल्यास ऐन वेळेस राजकीय कोंडी होऊ नये म्हणून त्यांच्याऐवजी रोहिणी खडसे यांचे नाव देण्यात येणार असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी समोर पेच प्रसंग उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राष्ट्रवादीने राष्ट्रवादीने ऍड रोहिनी खडसे यांचे नाव जाहीर केल्यामुळे बारा आमदार निवडीचा मार्ग मोकळा होण्याच्या मार्गावर असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्यपाल व सरकारमधील संघर्ष राज्याला नवा नाही मात्र राज्यपाल आमदार नियुक्ती वरून भविष्यात भाजपाला अडचणी चे ठरणारे काही नावे वगळण्यात येणार असल्याची राजकीय चर्चा आहे. खडसे जर सभागृहात आले तर विरोधकांना मोठे अडचणीचे ठरणार अशी एकंदरीत राजकीय चर्चा रंगली आहे.
खडसे हे भाजपचे पूर्वाश्रमीचे दिग्गज नेते होते त्यांच्या कार्यकाळात भाजपने अनेक निवडणुका जिंकल्या मात्र मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने खडसे यांचा अंतर्गत पक्षातील संघर्ष सुरू झाला चौकशीचा ससेमिरा सुरू करून भाजपाने चारी बाजूने नाकाबंदी केली, यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते आहेत आज गायत त्यांच्या भोवती उत्तर महाराष्ट्रातील राजकारण फिरताना दिसले आहे भाजपाच्या संघटना वाढीसाठी त्यांचा मोठा वाटा होता. मात्र गैरव्यवहाराचे आरोप आणि भोसरी भूखंड प्रकरणात त्यांची राजकीय अडचण करण्यात आली राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर देखील त्यांचे राजकीय पुनर्वसन झालेले नाही परंतु त्यांच्या कन्येला संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.