जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | अनेक दिवसापासून राज्यपाल नियुक्ती आमदारकीचा तिढा यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना आमदारकी मिळायला नको.. म्हणून एक गट सक्रिय असल्याची राजकीय चर्चा आहे. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी चाळीसगाव पूरग्रस्त परिसराची पाहणी करताना पक्ष खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. यंत्रणा मात्र कोन चालवत याबाबत जाहीर वाच्यता करायला कोणीही तयार नाही. यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील खडसे यांना आमदार की मिळाला नको.. म्हणून राज्यपालांकडे तक्रारी केलेल्या आहेत, मात्र हे सगळं कटकारस्थान विशिष्ट आशा यंत्रणेकडून राबवली जात असल्याची चर्चा जोर धरत आहे.
खडसे हे राज्यातील प्रभावशाली नेते आहेत, सभागृहांमध्ये आजपर्यंत त्यांची भाषणे गाजलेली आहेत विरोधी पक्षनेते पदाचा त्यांचा काळ सर्वाधिक चर्चेत राहिला, सत्ताधाऱ्यांना सडो कि पळून सोडणारे लोकनेते म्हणून त्यांची त्या काळात ओळख निर्माण झाली. अनेक निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले सत्ता नसताना देखील भाजपचा प्रभाव त्यांनी कायम ठेवला. संघटन कौशल्याची कमान असल्याने भाजपला त्याकाळात वाढण्यासाठी प्रमुख संधी चालून आली बैलगाडी पुरावे देण्याची भाषा खडसे यांनी सभागृहात केली. यामुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्याचे काम त्यांनी केले. यामुळे राज्यात गेल्या कालखंडात विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची ख्याती प्रख्यात झाली, आघाडी सरकार विरोधात राज्यभर रान पेटवून ते यशस्वी ठरले. मात्र खडसे हे सगळं करीत असताना त्यांचे अनेक अंतर्गत शत्रू सक्रिय झाले याकडे मात्र खडसेंचे दुर्लक्ष झाले खडसेंची पताका चौफेर मीरत असताना त्यांना मात्र विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देण्यासाठी खिंडीत पकडण्यात आले, प्रकृतीच्या कारणास्तव खडसे आता आपली जबाबदारी पार पाडू शकणार नाहीत, अशा बातम्या तेव्हा पेरण्यात आल्या होत्या. मात्र आपलं पद जाणार म्हणून प्रकृतीची अडचण असताना देखील अखा महाराष्ट्र व्हीलचेअर वर पालथा घातला यामुळे पक्षांतर्गत खेळण्यात आलेला गेम मात्र खडसे यांनी उधळून लावला.
2014 ची विधानसभेची निवडणुक महाराष्ट्रात खडसेंच्या फळीतील नेत्यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली, यावेळी पक्षाने खडसे यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली होती. शिवसेना-भाजप युती तोडण्याचा दोष आजही खडसें ना देण्यात येतो मुळात हाच पक्षादेश होता. असे काही जाणकार सांगतात याचे काहीनी भांडवल देखील केले. खडसे यांच्यावर तिकीट वाटपाची महत्त्वाची जबाबदारी होती. खडसे हे महाराष्ट्रातील कोअर कमिटीचे महत्त्वाचे घटक होते. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश भाजपने संपादन केले, राष्ट्रवादीच्या आवाजी मतदानावर सरकार राज्यात स्थापन केले मात्र मुख्यमंत्री पदासाठी संघातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मोहर लावण्यात आले खडसेंना वरिष्ठ असताना देखील त्यावेळी डावलण्यात आले याची खदखद वेळोवेळी त्यांनी बोलून दाखविली, ओबीसी नेतृत्वावर भाजपमध्ये अन्याय झाला तसे वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण झाले. खडसे हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते असे अनेक राजकीय नेते सांगतात, डझनभर खात्याचे मंत्रिपद दिली मात्र मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. तिथूनच संपूर्ण वादाला फोडणी देण्यात आली.
सरकार स्थापन झाले डझनभर मंत्रीपद मिळाले मात्र खडसेंची खदखद मनात कायम होती. मुख्यमंत्री पद नवख्या फडणवीसांना मिळाल्याने खडसे प्रचंड नाराज होते चाळीस वर्ष पक्षासाठी खस्ता खाऊन काय जाण जाणली ? असे अनेक सवाल खडसे पक्षनेतृत्वाला उपस्थित करू लागले. खडसे नेहमी याबाबत बोलत असत मात्र खडसे पक्षविरोधी भूमिका मांडतात असे रान वरिष्ठ पातळीवर पेटवण्यात आले, बा-कायदा खडसेंच्या भाषणाच्या चित्रफित पक्ष नेतृत्वा पर्यंत पोहोचवण्यात आल्या, खडसे बोलत होते मात्र जनतेत जाऊन बोलताय आणि यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते हे कारण पुढे करीत अनेक चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे सुरू झाला.
जावयाची लिंओझीन कार,पोलीस अधिकारी अशोक सादरे आत्महत्या प्रकरण,वाळू माफियांशी संबंध, दाऊदच्या बायकोशी संभाषण, भोसरी भूखंड प्रकल्प, मनी लॉन्ड्रिंग , बोगस शेअर खरेदी, संत मुक्ताई साखर कारखान्याला जिल्हा बँकेतून बेकायदा कर्ज असे विविध विषयावर प्रकरणे गाजली या दरम्यान, खडसे यांनी पक्ष नेतृत्वा पुढे दिल्ली दरबारी कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यक्रम आधीच नियोजित असल्याने नेत्यांनी भेट टाळली, त्यांनी मुंबई गाठत आपला राजीनामा दिला. अधिवेशना दरम्यान माझी चूक काय ? असा सवाल नेहमी विचारला मात्र पक्षांतर्गत डोकी नेहमी खडसेंविरोधात सक्रिय राहिली. कोअर कमेटी, संघटनात्मक जबाबदाऱ्या,विधान सभेची उमेदवारी या पेक्षा अधिक डावलण्यात आले. खच्चीकरण झाले, राजकीय गेम करण्यात आला. मात्र त्यांना कार्यकर्त्यांची सहानभूती कायम होती. जळगाव जिल्ह्यातून खडसेंवर भाजप मध्ये अन्याय होतोय ? असे त्यांचे कार्यकर्ते नेहमी सांगतात नाथाभाऊंनी भाजप सोडावा अशी कार्यकर्त्यांची ईच्छा होती ती त्यांनी पूर्ण केली.
मंत्री पदे तसेच उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात मजबूत पकड असणारे नेते म्हणून राष्ट्रवादीने त्यांचा प्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात करून घेतला मात्र प्रवेशा दरम्यान केलेले भाषण खडसेंना भोवले, तुम्ही ईडी लावली.. तर आम्ही सीडी लावू… हे विधान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला चांगलेच बोचले तेव्हा पासून खडसेंच्या मागे ईडीचे सर्कस सुरू झाले. नुकतेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी पलटवार करीत आमची ” ईडी लागली.. आता तुमची सीडी लावा.. असे आव्हान केले मात्र ती सीडी अद्याप मार्केट मध्ये आली नाही, खडसेंनी केलेली विधाने यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी प्रकरणात अटक झाली पत्नी मंदाताई खडसे यांनी देखील चौकशी करण्यात येणार आहे, ज्या बँकेच्या चेरमन रोहिणी खडसे आहेत त्या जिल्हा बँकेच्या ईडीची नोटीस देण्यात आली यामुळे संपूर्ण खडसे परिवारा भोवती ईडीचा ससेमिरा सुरूच आहे. खडसे जर राज्यपाल नियुक्त आमदार होऊन विधानपरिषदेच्या सभागृहात दाखल झाले तर त्यांची ताकत आणखी वाढेन म्हणून केंद्रातील ताकत वापरत खडसेंना आमदारकी नको.. म्हणून यंत्रणा सक्रिय असल्याची राजकीय चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अडसर नको म्हणून खडसेंची ईडीच्या माध्यमातून राजकीय नाकेबंदी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला असे जाहीर वतव्य ना.जयंत पाटील यांनी केले आहे.
टीप : आणखी बरच काही आहे. ते पुढच्या सदरात मांडूच..!