(जळगाव, राजमुद्रा वृत्तसेवा) आज रमजान ईदचे औचित्य साधून प्रा संजय मोरे (अण्णा)अध्यक्ष सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे तांबापुरा व हारिविठ्ठल नगर येथे तुरडाळ, साखर , चहापती ,पोहे , साबण, तांदुळ ईत्यादि जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. तसेच गरीब होतकरू, गरजवंत मुस्लीम बांधवांना क्षीरखुरमा साठी लागणारे साहित्य, बदाम, खरिख, काजू, मनुखा ,खोबरे, तुप, साखर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या ,अध्यक्षस्थानी प्रा. संजय मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.सुनील तायडे, महेंद्र सुरवाडे हे होते. संजय मोरे हे हा उपक्रम गेल्या 30 वर्षा पासून करीत आहे. ते संपुर्ण रोजे देखिल पाळतात. 26 व्या रोज्याच्या दिवशी निंभोरा येथे रोजा, ईफतेहार पार्टीचे, आयोजन करतात. या कार्यक्रमाला ,सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहतात. हेच हिंदु- मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाते. 2 वर्षा पासून कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. संजय मोरे हे वर्षातुन 2 वेळेस निंभोरा येथे इदगाह मैदानावर जाऊन नमाज अदा करतात. नमाज अदा झाल्यावर सर्व मौलाना यांचा शाल व फुलाचे बुके देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करतात. तर मुस्लीम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन, त्याची गळा भेट घेऊन ईद निमित्त शुभेच्छा देतात.
मागील वर्षी निभोरा येथे मोरे यांनी त्यांनी शाह (फकीर) लोकांना रावेर तालुक्या मध्ये, जीवनावश्यक वस्तूंचे रमजान ईद निमित्त परिवारासहित वाटप केले होते. त्यांचा हा उपक्रम गेल्या 30 वर्षांपासून सुरु आहे. शेवटच्या रोजाचे औंचित्य, साधुन रमजान ईद, निमित्त ताबापुरा, हरिविठ्ठल नगर येथे जीवनावश्यक वस्तू व शिरखुमा साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी प्रा संजय मोरे, प्रा.सुनील तायडे, महेन्द्र सुरवाडे, कृष्णा शांताराम सावळे, सचिन सुरवाडे, प्रज्ञारत्न मोरे, सुनील ठाकरे, श्रीरंग सुरवाडे, सकावत शाह, शिकदर तडवी , रमजान तडवी, आरिफ शेख, शकील शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णा सावळे यांनी केले तर आभार प्रा.साबीर शेख यांनी मानले.