जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन चेअरमन ॲड रोहिणी ताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेत 125 सभासदांनी ऑनलाइन सहभाग घेतला परंतु ज्या सभासदांना याबाबत आपली भूमिका मांडण्याचा त्यांचा आवाज म्यूट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बँकेच्या कर्ज वाटपाबाबत सभासदांनी कमेंट करून नाराजी व्यक्त केली .जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत चेअरमन रोहिणी ताई खडसे, एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर ,रवींद्र पाटील ,संजय पवार ,तिलोत्तमा पाटील ,नानासाहेब देशमुख ,गिरीधर नेते ,यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदविला आहे.
संचालक मंडळ व्यतिरिक्त जिल्ह्यातील 125 सभासदांनी ऑनलाइन सहभाग घेतला.सभेत नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली असे असताना सभासदांचे म्हणणे ऐकून घेतले नाही .ऑनलाइन सभा जवळपास एकतर्फी चालवली गेली असल्याचा आरोप शेंदुर्णी येथील देशमुख यांनी केला आहे. बँकेचे माजी संचालक तथा सांगवी सोसायटीचे चेअरमन प्रशांत लीलाधर चौधरी यांनी सांगितले की, मला बोलू दिले नाही तसेच माझा आवाज म्युट करण्यात आला यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालेले नाही. कर्ज हे फक्त संचालकांना दिले गेले आहे. अनेक संचालकांनी कोट्यवधींचे कर्ज घेतलेले आहे. शेतकरी मात्र उपाशी राहिला आहे .केवळ 50 टक्के कर्जावर शेतकऱ्यांना समाधानी मानावे लागले आहे. पीक विम्याचा मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने एकतर्फी सभा चालून संचालक मंडळाने सर्व विषय मंजूर केलेले आहेत मला तर वाटतं . शेतकऱ्यां चे हित संचालकांना पाहिले नाही या वार्षिक सर्वसाधारण सभे संदर्भात आक्षेप असल्याचे प्रशांत चौधरी यांनी सांगितले आहे.
अमळनेर तालुक्यातील शिरूर येथील विकास सोसायटीचे चेअरमन प्रा. शिवाजी पाटील यांनी सांगितले की 2019 मध्ये पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही, याविषयी बोलायला लागलो तर माझा आवाज म्यूट करण्यात आला तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांना केवळ 50 टक्के कर्ज वाटप झाले. एकाही संचालकाला शेतकऱ्यांचे हित दिसत नाही. संचालक मंडळाचा गेल्या सहा वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर बाराशे कोटी पर्यंत कर्ज वाटप करणारी जिल्हा बँक आता दीडशे कोटीवर कर्ज वाटप करीत आहे. असा हा बँकेचा इतिहास आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे कितपत निर्णय होतात याबाबत शंका असून ही सर्व माहिती कमेंटम ध्ये मी ऑनलाईन नोंदवली आहे .परंतु माझा आवाज जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांनी दाबला असा आरोप प्रा. शिवाजी पाटील यांनी केला आहे.
या संबंधी जिल्हा बँकेच्या चेअरमन ऍड रोहिणी खडसे यांना भ्रमणध्वनी केला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत त्यामुळे या संबंधी अधिक माहिती मिळू शकलेली नाही.