जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेतील सत्तावीस बंडखोर नगरसेवकांची जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पालिकेचे उपमहापौर कुलभुषण पाटील, शरद तायडे आदी उपस्थित होते. आगामी जळगाव शहरातील नागरिकांना सामोरे कसे जायचे त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कशी करायची कारण महापालिकेला शासनाकडून निधी कमी मिळालेला आहे अशी तक्रार उपस्थित बंडखोर नगरसेवकांनी केली आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा असे साकडे उपस्थित नगरसेवकांनी संजय सावंत यांना घातले त्यानंतर बंडखोर नगरसेवकांनी विचारलेल्या विविध शंका अडीअडचणी बाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून प्रथमच 61 कोटीचा निधी जळगाव पालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी दिला मात्र जिल्हा परंतु हा निधी तोडका पडत असल्याचे सांगण्यात आले, आणखी निधी शासनाकडून मिळाला तर नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली. त्यावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले सध्या कोरोनाचा कालावधी सुरू असल्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला निधी मिळालेला नाही हे लक्षात घेऊन नगरसेवकांनी कामे करावीत भविष्यात निधीबाबत कमतरता भासणार नाही याची जाणीव ठेवून तो वेळ प्रसंगी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यासह सत्तावीस बंडखोर नगरसेवकांनी काही प्रश्न उपस्थित करून सावंत यांचे लक्ष वेधून घेतले दरम्यान शिवसेनेतील सत्तावीस बंडखोर नगरसेवकांची बैठक पार पडली असली तरी अमृत योजनेअंतर्गत रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुख सुविधा सर्वसामान्य नागरिकांना कशा मिळतील ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून राजकीय पक्ष त्यासाठी मोर्चे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे. तर महापालिकेत शिवसेनेला सत्ता मिळवून पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप सामान्य जनतेच्या कोणत्याही गरजा पूर्ण होऊ शकले नाही अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे एवढेच नव्हे तर नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी पालिकेतील भाजपचे नगरसेवक देखील आता जागृत झाले आहेत त्यांनी एकजुटीने नागरिकांच्या हक्कासाठी लढा देण्याबाबत संघर्ष सुरू केला आहे. आता मुकाबला शिवसेना विरुद्ध भाजपा नगरसेवक असा रंगला असला तरी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कोणता नगरसेवक कोणता पक्ष आणि कोण करून देतो याकडे लागून आहे.