निष्काळजी पणा करणाऱ्या अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी.
नगरदेवळा ता. पाचोरा | येथून जवळच असलेल्या नेरी येथील गणेश रावसाहेब पाटील यांची शेती नेरी कजगाव रस्त्यालगत गट क्रमांक 46 असुन आज दुपारी दोन वाजे दरम्यान त्यांचा एकुलता एक नऊ वर्षाचा मुलगा वेदांत कापुस पिकात काम करत असलेल्या आई वडिलांना पाणी देण्या करिता जात होता. वीज पोल वरील कापुस पिकातील तुटलेला तार त्याच्या लक्षात न आल्याने त्यावर पाय ठेवला गेला व शाॅक लागुन त्याचा जागीच मृत्यु झाला. ते शेतातच रहात होते. ही बाब लक्षात येताच त्याच्या पालकांनी आरडा ओरड केली. परिसरातील नागरिकांनी चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
ग्रामस्थ संतप्त नेरीत शोककळा
वेदांतची मृत्यूची बातमी कळताच नेरी गावातुन वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारा विषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असुन कर्मचाऱ्याने अधिकारी वर्गाला फोन करुनही रात्री 8 वाजे पावेतो एकही अधिकारी तेथे येऊ शकले नाहीत. त्यांना मनुष्याच्या जीवाची किती काळजी आहे हे यावरून दिसते. महावितरण च्या कामचुकार व निष्काळजी पणा करणाऱ्या दोषींनवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उद्या पोळा असुन नेरी ग्रामस्थावर शोककळा पसरली आहे.