जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची दाहकता अद्याप पर्यंत कायम आहे. मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका चाळीसगाव, औरंगाबाद महामार्गावरील कन्नड घाटात बसला होता, कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक चोवीस तासांपेक्षा जास्त काळ बंद राहिले. त्यावेळी चाळीसगाव येथे गावात तर पावसामुळे घर दुकान पाण्यात गेली होती. बँकेत पाणी शिरल्याने मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे. अक्सिस बँकेत थोडी नाही तर तब्बल 40 लाख रुपयांची रोकड पावसाच्या पाण्यात भिजली आहे. महापुराचे पाणी बँकेत शिरल्याने लॉकर मध्ये गाळ भरला गेला आहे. लॉकर मधील तारण रक्कम सोना – चांदी हे देखील भिजलेलं आढळून आलेला आहे.
अक्सिस बँकेचे वरिष्ठ अधिकारी आल्यावर रोकड ची मोजणी करण्यात आली. आणखी तपासणी करण्यात येत आहे, त्यानंतर नुकसानीची आणखी आकडेवारी समोर येईल. पावसामुळे बँकेचे पाणी शिरलं हे अधोरेखित असलं तरी त्यामुळे रोकड नोटां बँकेतील अन्य साहित्य ही पावसाने भिजले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झालेला आहे. बँकेचे संगणक खुर्च्या पाण्याखाली होते त्यामध्ये बिघाड झाला आहे. आता बँकेचे कामकाज पाचोरा येथून चालवले जात आहे. मात्र पावसामुळे बँकेचे सर्व व्यवहार चाळीसगाव तालुक्यात रखडलेले आहेत. ग्राहकांना बँकेतून पैसे काढणे देखील मुश्कील झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.