जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जैन इरिगेशन सिस्टीम लि.,बांभोरी धरणगांव येथील कंपनीत जवळपास १० ते १२ वर्षापासून काम करीत असलेल्या कुशल कामगारांना कंपनीकडून काहीएक कारण नसतांना कामावरुन कमी करण्यात आलेले असल्याने त्यांचेसह संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे.याबाबत त्यांनी कंपनी प्रशासनाकडे वारंवार विचारपूस केली असता त्यांना कंपनीकडून उडवा उडवीचे उत्तर मिळत आहे, कर्मचाऱ्यांकडून कंपनी प्रशासनाने बळजबरीने राजीनामे लिहून घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि. ०८/०९/२०२१ बुधवार रोजी ठिक ११.०० ते ५.०० या वेळेत कंपनीच्या प्रवेशाद्वाराजवळ एक दिवशीय आंदोलनाचा मार्ग कंपनीतून कमी करण्यात आलेले कर्मचारी त्यांचे कुटुंबासह तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम, रस्ते आस्थापना यांचेसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेमार्फत करण्यात येणार असून या उपर संबंधित कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत हा लढा सुरुच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यासंदर्भात कंपनी वर झालेले आरोप फेटाळून लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे, जैन समुहाकडून अधिकृत अद्याप पर्यत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.