जळगाव (अमळनेर ) राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील सात्री गावातील सुरेश भिल्ल यांची मुलगी आरोषी गेल्या काही दिवसापासून तापाने आजारी होतीस मंगळवारी सकाळी ता पडल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले होते म्हणून तिला शेजारच्या गावातील दवाखान्यात हलवण्याची तयारी करण्यात आली, नदीला मोठ्या प्रमाणात पूर असल्याने पलिकडच्या गावात जाणे अशक्य होते, गावकऱ्यांनी एकत्र येत एका खाटेला हवा भरलेल्या ट्यूब बांधून नाव तयार केली. आरुषी व तिच्या आईला बसून नदीपार केली परंतु उपचारार्थ उशीर झाल्याने दवाखान्यात पोहोचेपर्यंत तिचा दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील आरुषीचा जीव वाचवताना आल्याने गावकऱ्यांनी यावेळी आपल्या संवेदना व्यक्त केल्या ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करत प्रशासनाला आणखी किती जीव घ्यायचे आहेत असा असा संतप्त सवाल देखील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
अमळनेर तालुक्यातील सात्री हे गाव तापी नदी त्यांनी मतारी प्रकल्पामुळे पुनर्वसित आहे मात्र गेल्या आठ वर्षापासून या गावाच्या पुनर्वसन झालेलं नाही या उलट दुर्लक्ष करण्यात येत आहे. हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून देखील सात्री करांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत, दरवर्षी पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटतो जिवावरची कसरत करत ग्रामस्थांना नदी पार करावी लागते आणीबाणीच्या परिस्थितीत पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून अत्यावश्यक असलेली साधने आणावी लागतात. शासन दरबारी प्रस्ताव प्रलंबित असताना देखील अद्याप पर्यंत दखल घेतली गेलेली नाही. यामुळे आता तरी जिल्हा प्रशासनाने सात्री ह्या गावाकडे लक्ष द्यावं असं ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे.