(राजमुद्रा वृत्तसेवा) मराठा आरक्षणासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांवर शब्दफेक करत ‘चंद्रकांत पाटलांना आरक्षणातील काय कळतं? चंद्रकांत पाटील हे चुकीची माहिती पसरवत आहेत.’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला उत्तर देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आज अशोक चव्हाणांना घणघणाती उत्तर देत तीव्र संताप व्यक्त केला. “अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं.” असे उद्गार त्यांनी माध्यमांशी बोलताना काढले.
अशोक चव्हाण यांना प्रतिउत्तर देत चंद्रकांत पाटील यांनी आज आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून ‘अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये’, असे उत्तर देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
मराठा आरक्षणाला घेऊन सध्या महाराष्ट्रात सध्या अनेक नवनव्या मुद्यांवर वार पलटवार होत असताना चंद्रकांत पाटील यांची अशोक चव्हाणांवरची आजची संतप्त प्रतिक्रिया पुढे जाऊन कोणत्या नव्या वादळाला सुरुवात करेल हे बघण्यासारखे राहील. मराठा आरक्षणाचा पुनर्विचार याचिका केंद्र सरकारने दाखल जेली असून याचाही नेमका काय परिणाम येतो हेही पाहण्यासारखे आहे.