मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | आ. किशोर पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.तसेच भडगाव- पाचोरा-चाळीसगाव मतदारसंघात झालेल्या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक निधीची तरतूद करावी अशी मागणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी झालेल्या नुकसानाची माहिती घेत पूरग्रस्तांना लवकरच मदत जाहीर करण्यात येईल असे आश्वासन आ. किशोर पाटील यांना दिले आहे.
नुकसानग्रस्त झालेल्या भागाची तसेच शेतीची पाहणी दरम्यान पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असता युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी याबाबत सूचना केले आहेत.
चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्यानंतर शेतकऱ्यांचे तसेच स्थानिक ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतीतील पीक संपूर्ण पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पूरग्रस्त स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचे पाणी तसेच नद्यांचे पाणी थेट शेतात शिरल्याने संपूर्ण पिकाची नासाडी झालेली आहे काही शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत त्याचे देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच डोगरी व तितुर नदीला नुकताच पुर येवून गेल्याने, शहरासह तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी गावांना पुराचा चांगलाच फटका बसला होता. यात शेकडो जनावरे व पशुधनाचे नूकसान झाले होते. पहिल्या पुराच्या या जखमा ताज्या असताना पुन्हा डोंगरी व तितूर नदीला महापुर आल्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक गावांचे पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नूकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५३०० हेक्टर शेती पाण्याखाली येवून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तर ३३ पशुधन व २३३ घरांचे नूकसान झाले आहे. सतत धार पावसामुळे तालुक्यात लागोपाठ दोन पुर आल्यामुळे तालुक्यात मोेठे आर्थिक नूकसान झाले आहे.