(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) सध्या शासनाचे कडक निर्बंध लागू असल्याने बेरोजगारी सदृश्य परिस्थिती निर्माण झली आहे. अशातच रेल्वे स्थानकावर असलेल्या २२ कुली बांधवांचे आणि परिवाराचे लॉकडाऊनमुळे फार अधिक प्रमाणात हाल होत आहेत. रेल्वेचे प्रवासी घटल्याने रोजच्या दोन वेळच्या खाण्याचे देखील प्रश्न निर्माण झाले आहेत. कुली बांधवांची ही अडचण लक्षात घेऊन जळगावातील व्यावसायिक ओम साई रियल इस्टेटचे रमेशकुमार मुनोत यांच्या सौजन्याने युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे काल (ता 13) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळ कुली बांधवांना किराणा किट वाटप करण्यात आले.
रेल्वेचा प्रवास बंद असल्याने प्रवासी वर्ग नाहीसा झाला आहे त्यामुळे या रोज काम करून पोट भरणाऱ्या हमाल बांधवांना लॉकडाऊन काळात जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कुली बांधवांची ही गरज लक्षात घेऊन जळगाव शहरातील व्यावसायिक होम साई रिअल इस्टेट च्या माध्यमातून ही सामाजिक बांधिलकी म्हणून मानवसेवा करण्यात आली. यावेळी स्टेशन मास्तर ए.एम.अग्रवाल, रेल्वे पोलीस फोर्सचे निरीक्षक सी.एस.पटेल, क्षेत्रीय रेल्वे उपभोगता समिती सदस्य विराज कावडिया, युवाशक्ती फाऊंडेशनचे अमित जगताप, संदीप सूर्यवंशी, उमाकांत जाधव, प्रितम शिंदे, पियुष तिवारी, वैभव पाटील, कुली बांधवांचे मुकादम अमीर खान व इतर कुली बांधव, नागरिक उपस्थित होते.