जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरातील निवासस्थानी आज गणरायाची स्थापना करण्यात आली. महाजनांच्या पत्नी नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, कन्या श्रेया यांच्यासह सहकुटुंब पूजा करण्यात आली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाजनांच्या निवासस्थानी अत्यंत साध्या पद्धतीनं गणेशाची स्थापना करण्यात आली.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून माहाविकास आघाडीचे सरकार आहे. जनता त्यांच्या कारभाराला कंटाळली आहे. राज्यात कुणीही सुखी नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला हे सरकार लवकर जावे, असं वाटतं. तसेच भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा या राज्यात यावे असं जनतेला वाटत आहे. गणरायाची सुध्दा तीच इच्छा आहे. त्यामुळे आपण त्यांना सरकार बदलण्याचे साकडं घालणार नाही. गणरायाचं आता सरकार बदलण्याची इच्छा पूर्ण करून, राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यातील कोरोना आणि महापुराचे संकट दूर होऊ दे, अशी याचना आपण गणरायाकडे केल्याचं महाजन यांनी सांगितलं. सत्ता नसल्याची खदखद त्यांनी यावेळी माध्यमांसमोर बोलून दाखवली.