जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसापासून ईडीचा ससेमिरा सुरू असताना खडसे यांच्या माध्यमात विविध बातम्या येत आहे. खडसे यांच्या अडचणीत अधिक वाढ झाल्याचे समोर आले आहे. भोसरी भूखंड प्रकरणात थेट न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवित खडसेंनी मंत्रिपद असताना पदाचा गैरवापर करत आपल्या परिवाराला लाभ पोहोचण्यासाठी गैरव्यवहार केला, असे ताशेरे ओढले आहे. यामुळे खडसे यांना फक्त राजकीय नाकाबंदी नव्हे तर कायदेशीर अडचणी देखील निर्माण झाल्या आहे.
खडसेंची पुढील राजकीय वाटचाल अधिक खडतर
खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात भाजपने मोठ्या प्रमाणात विजय संपादन केले मात्र, अंतर्गत वादातून त्यांना पक्षातून वेळोवेळी डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू झाला. यापूर्वी देखील भोसरी भूखंड प्रकरणात त्यांची चौकशी झाली आहे. ईडीने त्यांच्या विरोधात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करून घेतले. याप्रकरणी यांचे जावई गिरीश चौधरी यांना देखील कस्टडीत ठेवले आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत असताना त्यांचा जामीन नाकारला. खडसे यांनी केलेला व्यवहार पाहता त्यांचे जावई गिरिष चौधरी यांना जामीन देणे योग्य राहणार नाही, तसेच या निकालाचे पडसाद समाजावर चुकीच्या पद्धतीने उमटतील असेदेखील न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे खडसे यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.
खडसेंना आता कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार
माजी मंत्री खडसे यांनी नेहमी आपल्या भाषणामध्ये मी मजबूत आहे, मी झोकणार नाही, वाकणार नाही असं विरोधकांना वेळोवेळी ठाम उत्तर दिलं, मात्र कायदेशीर अडचणींचा डोंगर पाहता जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीत काय नेमके परिणाम होतात. याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.