पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडीचे मंत्री दादासाहेब भुसे करणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून शेतकरी राजा परेशान झाला आहे. त्याची दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांना नाशिक जिल्हा व जळगाव जिल्हा येथील प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले व त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती नुकसान झाले आहे याची माहिती घेण्याचे सूचना दिल्या.
त्यानुसार काल पाचोरा येथे कृषी मंत्री दादासाहेब भुसे, पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील, अधिकारीवर्ग, भूगर्भ अधिकारी यांना सोबत घेऊन पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे व त्याची संपूर्ण माहिती घेऊन झालेल्या नुकसानाचे पंचनामा करून जास्तीत जास्त निधी मिळावा, याकरिता प्रयत्न करतील. आज दुपारी पाचोरा तालुक्यात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे व पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील व अधिकारीवर्ग पाहणी करणार आहे.