जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय युवक मंडळ, बाळगाव यांच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
तसेच सर्व वरांचे फार्म तारीख ३० सप्टेंबर २०२१ पावेतो स्वीकारले जाणार आहेत. तरी सर्व समाज बांधवांनी वधू-वरांचे फार्म युवक मंडळाचे कार्यालय शनिपेठ, चंदनवाडी, मायक्का देवीच्या पाठीमागे, जळगाव येथे जमा करावे, असे युवक मंडळाद्वारे एका पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.