जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ‘माझे मतदान माझे अधिकार’ या अभियानाअंतर्गत आज पाळधी येथे शिवसेनेच्यावतीने नवीन मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, पाळधी बु. सरपंच प्रकाश नाना पाटील, पाळधी खुर्द सरपंच शरद भाऊ कोडी, उपसरपंच चंदन कळमकर, माजी सरपंच अरुण पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, दोनगावचे किशोर, दीपक सावळे, प्रशांत झंवर, धरणगावचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ त्यांच्यासोबत तहसील येथील कर्मचारी पिंटू पाटील आदी उपस्थित होते.
मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते यासाठी मतदार नाव नोंदणी जरुरी आहे, असे जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.