जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरात शिवसेना व मांगीलालजी नेत्रपेढीतर्फे १०० नागरिक व शिवसैनिक यांचे नेत्र तपासणी करण्यात आले. तसेच २० शिवसैनिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला.
याप्रसंगी नागरिक व शिवसैनिक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लद्धा, महानगर प्रमुख शरद तायडे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये २० शिवसैनिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला. यावेळी नवीपेठ शाखा प्रमुख जयवर्धन नेवे, शाखा उपप्रमुख लक्ष्मीकांत अडावदकर, सचिव चंद्रशेखर वाणी, उपसचिव निरंजन देशमुख, हर्षल गवळी, संदेश झंवर, सुजय रणदिवे, केशव माळी, यश गवळी, तरुण अरतानी, पंकज जैन, रोहित गवळी, कृपाल अडावदकर, प्रतीक अडावदकर आदी सदस्य उपस्थित होते.