पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा | पाचोरा येथील श्री क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मारकासंदर्भात आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या निवासस्थानी पाचोरा माळी समाज पंच मंडळातर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी कृष्णपुरी पाचोरा माळी समाज पंच मंडळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुकाध्यक्ष संतोष परदेशी, पाचोरा शहर अध्यक्ष कन्हैया देवरे, माळी समाज पंच मंडळ समाज अध्यक्ष संजय महाले, पाचोरा शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुदर्शन आत्माराम सोनवणे, अध्यक्ष संतोष महाजन, सहसचिव शरद गिते, सुनील महाजन, शुभम महाजन, राजूभाऊ महाजन नवरदेवळा, प्रदीप परदेसी, प्रकाश तांबे बहुजन समाज बांधव उपस्थित होते.