रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | रावेर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात ‘फ्ल्यू’ची साथ पसरत आहे. त्यामुळे रुग्णालय फुल झाली आहेत. रविवारपासून फ्ल्यु’च्या साथीत चांगलीच वाढ झालेली दिसत आहे. प्रत्येक गावामध्ये नागरिकांना सर्दी, पर्स, ताप, डोके दुखणे, सारखे लक्षणे जाणवत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाल्याने यात वाढ झाली आहे. ‘फ्ल्यू’ची लागण झाल्यास तो अतिवेगाने पसरतो. त्यामुळे घरातील इतर नागरिकांनाही लागण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे.
साथीत घ्यावयाची खबरदारी
पाणी गाळुन प्याये, स्वच्छता राखावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, उघड्या वरील पदार्थ खाणे टाळावे, खोकलतांना रुमाल वापरावा व लगेच डॉक्टरांना दाखवावे अश्या सूचना डॉक्टरांतर्फे करण्यात आल्या आहेत .
असे आहे फ्ल्यू’चे लक्षणे
अस्वच्छते अभावी देखील अनेक रोग पसरतात. मागील दोन तीन दिवसानपासून फ्ल्यू’चे अनेक रुग्ण आढळत आहे. फ्ल्यु’चे लक्षणे मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला, ताप, आढळतो. एकास झाल्यास त्याच्या संर्पकात येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला देखिल फ्ल्यू’चे लक्षणे आढळतात
हॉस्पिटल फूल; काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन
सर्दी खोकला ताप मोठ्या प्रमाणात लहान मुलांना जाणवत आहे. त्याच प्रमाणे मोठ्या व्यक्तीला सुध्दा असेल लक्षणे दिसत आहे. यामुळे रावेर शहरातील सर्व हॉस्पिटल फूल झाले आहे तासों-तास उपचारार्थ नंबरमध्ये बसाव लागत आहे. फ्ल्यू टाळण्यासाठी घरातच रहावे, बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असा सल्ला डॉक्टराकडून देण्यात आला आहे.