धुळे राजमुद्रा वृतसेवा – येथील मे. न्यायालय, धुळे यांनी रे.द.नं. 42/2014 मध्ये दिनांक 3 ऑगस्ट रोजी निर्णय दिला असून या निर्णयानुसार अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्थेचा संगणक डाटा मे. न्यायालयाचे देखरेखीखाली पतसंस्थेस उपलब्ध करून देणेबाबत आदेश पारित करण्यात आला आहे. मे. न्यायालय, धुळे यांचेकडून संगणक डाटा/दप्तर उपलब्ध झाल्यावर पतसंस्थेचे दप्तर अद्यावत करण्यात येईल. पतसंस्थेचे दिनांक 31 मार्च 2012 रोजी पर्यंतचे लेखा परिक्षण झालेले आहे. तसेच दिनांक 01/04/2013 पासून ते आजपर्यंत लेखा परिक्षण करण्यात येईल. व त्यानंतर ठेवीदारांची ठेव रक्कम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 च्या तरतुदीनुसार ठेवीची रक्कम परत केली जाईल. असे लेखी पत्राद्वारे आश्वासन अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्थेचे अवसायक श्री. मनोज चौधरी अध्यक्ष अवसायक मंडळ तथा सहाय्यक निबंधक अधिकन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2021च्या लेखी पत्राद्वारे श्री. वाल्मिकअण्णा दामोदर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना देवून आश्वासित केले आहे.
ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम ठेवीदारांना देण्यात यावी व नियमबाह्य कर्ज देवून कर्ज वसुली न करणार्या पतसंस्थेचे चेअरमन श्री.संजय अग्रवाल व त्यांच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करून कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. या मागणीसाठी दिनांक 21 सप्टेंबर 2021 पासून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धुळे यांचे कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षातर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार होते.
अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्थेचे धुळे येथील पुष्पांजली मार्केट येथील भाड्याच्या ईमारतीत पतसंस्थेचे कार्यालय सुरु होते. तेथे कायमस्वरुपी फर्निचर, संगणक, संस्थेचे कर्जदार व ठेवीदार यांचे दप्तर व ईतर आवश्यक असलेले महत्त्वाचे दप्तर ठेवलेले होते. सदर घरमालकाचे सुमारे 5 लाख रुपये बाकी असल्यामुळे घरमालकाने मे. न्यालयात दाद मागितली. मे. न्यायालय धुळे यांनी रे.द. 42/2014 मध्ये दिलेल्या निर्णयामुळे संस्थेचे दप्तर संगणक जप्त करण्यात आले. त्यामुळे संगणकात कर्जदार यांची संपूर्ण माहिती असल्यामुळे संचालक मंडळावर व इतर बाबींवर अवसायक मंडळांना कारवाई करता आली नाही. त्यामुळे कर्जदारांकडून वसुली झाली नाही.
मे. न्यायालय, धुळे यांचेकडून रे.द.नं. 42/2014 मध्ये दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार पतसंस्थेचे दप्तर, संगणक डाटा पतसंस्थेच्या अवसायक मंडळास उपलब्ध झाल्यावर पतसंस्थेचे कामकाज सुरु होणार आहे. त्यामुळे श्री वाल्मिकअण्णा दामोदर यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जदाराकडून व्याजासह कर्जाची रक्कम वसुल करण्यात येऊन त्या रक्कमेतून ठेवीदारांच्या ठेवीच्या रक्कमा देण्यात येणार आहे.