नाशिक राजमुद्रा वृतसेवा | सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, यांची दक्षता सराफ व्यापारी घेताना दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर ईडी च्या कार्यावाह्या सुरु आहे, यांची धास्ती सराफ व्यापाऱ्यांनी घेतलेली दिसून येत आहे.
सोमवारी (13 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी, तर चांदी 300 रुपयांनी स्वस्त होती. सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47500, तर चांदीचे दर किलोमागे 66200 रुपये नोंदवले गेले आहे.
नाशिकच्या सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,600 होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,800 होते. शनिवारी या दरातमध्ये कसलिही चढउतार झाली नाही. विशेष म्हणजे रविवारीही हेच दर होते. सोमवारी (13 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी स्वस्त होऊन 47500 होते. 22 कॅरेट सोन्याच्या दरात मात्र 200 रुपयांची वाढ होऊन ते 45000 रुपयांवर गेले. नाशिकमध्ये गुरुवारी चांदीचे किलोमागचे दर 65,800 होते. गुरुवारच्या तुलनेत शनिवारी चांदीच्या दरात तेराशे रुपयांची वाढ झाली होती. रविवारी हेच दर कायम होते. मात्र, सोमवारी चांदीचे दर किलोमागे 300 रुपयांनी स्वस्त होत 66200 रुपयांवर स्थिरावले होते. सोने आणि चांदीच्या या दरावर अतिरिक्त जीएसटी असणार आहे.