मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आक्षेप आक्षेप नोंदवित पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात मुख्यमंत्र्यांन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. राज्यात शिवसेना – भाजप संघर्ष संपत नाही तोवर हा नवा वाद उभा राहिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, यावेळी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला सामना या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले. या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असं भातखळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.