मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आल्या त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात काय चुकीचे बोलले मुख्यमंत्री? माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली आहे, असं शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी भाजप नेते अतुल भातखळ यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना त्या भडकल्या आहेत.
राज्यांना या सूचनेचे पालन करत कर्नाटक सरकार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकार अशाच पद्धतीने नोंदी ठेवत आहेत. केंद्राच्या अनेक योजना आहेत, कामगारांच्या या योजनांसाठी अशा नोंदी ठेवाव्याच लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी किती मायग्रेट वर्कर अनेक राज्यातून आपापल्या घरी गेले त्याची नोंद झाली होती. भाजपवाले फ्रटेशनमध्ये आरोप करत आहे. त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणं म्हणजे वेळ घालवण्यासारखा प्रकार असल्याची टीका आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे.