मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । महाराष्ट्रात कोविड नियमांचे पालन करून भक्तांसाठी मंदिर उघडायला हवीत. नागरिक नियम पाळत आहे. उद्धवजींनी आता मंदिरं उघडायला हवीत, असं मतं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यक्त केल आहे. तसंच ही मागणी करताना त्यांनी वाढलेल्या लसीकरणाचा टक्का देखील अधोरेकित केला. गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र भाजप कडून राज्यभरात मंदिर उघडण्याची मागणी घेऊन घंटा नाद आंदोलन करण्यात आली होती.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. तर महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार दिला जातोय. अशाही परिस्थितीत राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी भाजप करत आहे. आतापर्यंत राज्यातील भाजप नेते मंदिरं उघडण्याची मागणी करत होते. आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीच मुख्यंमंत्र्यांकडे मंदिरं उघडण्याची मागणी केल्याने महाविकास आघाडीला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.
देशातील कोयरी स्थिती
24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 25 हजार 404 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 339 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. विशेष म्हणजे देशभरात काल 75 कोटी लसीकरणाचा टप्पाही पार पडला.