जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जळगाव महानगर आणि जिल्हा ग्रामीण तर्फे भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. महाविकास सरकार ओबीसींचे आरक्षण वाचवू शकलेली नाही किंवा यासंदर्भात कायदेशीर बाजू देखील भक्कम पणे सरकारने मंडळी नाही आरोप यावेळी भाजपने केला आहे.
ओबीसी आरक्षण संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी तसेच ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मनोज काळे, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष सौ रेखाताई पाटील, महिला मोर्चा दिप्ती ताई चिरमाडे,महिला सरचिटणीस रेखाताई वर्मा, क्रीडा आघाडीचे अरुण श्रीखंडे, ओबीसी उपध्यक्ष तृप्ती ताई पाटील, चंदु महाले, विजय बारी, शांताराम गावंडे, अमित देशपांडे ,युवा मोर्चाचे श्री.शुभम बावा, युवा मोर्चाचे सरचिटणीस मिलींद चौधरी, जितेंद्र चौथे, सचिन बाविस्कर, प्रथम पाटील, रितेश सोनवणे यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.