नवी दिल्ली राजमुद्रा वृतसेवा – भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील नेत्यांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्ट्राचार काढण्यास सुरवात केली आहे . त्यामुळे अनेक नेतेमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे . त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे .
सोमय्या यांना ईडीचे प्रवक्ते पद द्यावे असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. रोहित पवार दोनदिवसापासून दिल्लीत आहेत त्यांनी केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्जत जामखेड मधील विकास कामावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, सोम्य्याना भाजपने एक ओफिसिअल पोस्ट द्यावी ईडीचे प्रवक्ते असे काही तरी पोस्ट त्यांना द्यावी आता त्यांच्याकादे एक प्रतिनिधी एवढेच पद आहे. त्यांना प्रवक्ते केले तर ते ईडीचे प्रतिनिधी आहेत हे ओफिसिअल होऊन जाईल. ईडीना कडायाच्या आदि त्यांना बर्याच गोष्टी काळात असतात असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
यावेळी त्यांनी ईडीच्या गैर वापरावर टीका केली. ईडी किवा सिबिआइ चा राजकीय वापर होत असेल तर, घातक आहे नाहीतर तो पायंडा पडतो एखाद्या राजकीय नेत्याला दाबायचे असेल तर अशाच यंत्रणाच वापर केला पाहिजे असे संबधिताना वाटते. लोक घाभरतात कारण त्यात तत्थ नसले तरी त्याप्रक्रीयाने त्रास होतो कुटुंबावर परिणाम होतो . त्यातून काहीच बाहेर येत नाही असा आरोपही पवार यांनी केला.