नवी दिल्ली । भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिकाच एकामागून एक सुरु ठेवली आहे. यामुळे राज्यात रोज खळबळ जनक दावे केली जात आहे. अशावेळी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. . परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांना त्यांनी 72 तासांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. तर अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नसल्याचं उत्तर सोमय्या आज दिल आहे यामुळे परब सोमय्या वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे, आर्थिक गैरव्यहार झाल्याची तक्रार देखील सोमय्या यांनी दिल्याचे समजते आहे.
काय म्हणाले सोमय्या –
अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही. आता शिवसेनेला असं वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात. आता विदर्भातील काँग्रेसचे मंत्री टार्गेटवर असल्याचा इशाराच सोमय्या यांनी आज माध्यमांना दिला आहे. कॉग्रेस , राष्ट्रवादी सह अनेक नेत्याचे भ्रष्ट्राचार बाहेर काढणार असल्याचे सोमय्यांनी माध्यमांना सांगितले आहे. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येणार आहे. एनसीपी परिवारातील एक मोठा घोटाळा बाहेर येणार आहे, असं सोमय्या म्हणाले आहे. एकाच सोबत महाविकास आघाडीच्या नेत्याचे बाहेर येणारे घोटाळे वरिष्ठ नेत्यांना डोकेदुखी ठरत आहे.
दरम्यान, विदर्भातील काँग्रेस मंत्र्यांपैकी सोमय्या यांचा रोख कुणाकडे आहे? असा सवाल आता विचारला जातोय. विदर्भात काँग्रेसचे सुनिल केदार, विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर या मंत्री आहेत. तर राष्ट्रवादी परिवारातील आता कोणता मंत्री सोमय्यांच्या रडारवर आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.