जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी मिशन क्रॅक – डाऊन ची घोषणा केली आहे. सोमवार पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हा पातळीवर कठोर निर्बंध म्हणजे कोरोनाचे वाढते रुग्ण कमी करण्याचा उद्देश जिल्हा प्रशासनाचा आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे,आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहूळे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.
लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिकांनी गर्दी न करता एक दिवसा आगोदर कुपन घेऊन जाणे अनिवार्य आहे जेणे करून उन्हाचे दिवस असल्याने त्यांना सोईयुक्त होईल व स्थानिक स्तरावर जिल्हा पोलिस दल जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा ,महापालिका,नगरपालिका, नगरपरिषद नगरपंचायत,ग्रामपंचायत स्तरावर संयुक्त रित्या कार्यवाही मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या माहिती नुसार स्थानिक पातळीवर मिशन क्रॅक-डाऊन अंतर्गत विविध कारणे दाखवित रस्त्यावर फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. दि १५ ते ३० या पंधरा दिवसात रुग्ण संख्या कमी करण्यासाठी कठोर पावले उचलत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आली आहे.
फळे व भाजीपाला व्यावसायिकांना महापालिकेने ठरवलेल्या जागेत ७ ते 11 व्या वेळेत व्यवसाय करू दिला जाणारा आहे, इतरत्र ठिकाणी भाजीपाला व्यावसायिक व्यवसाय करताना दिसल्यास महापालिका व पोलिसांकडून सोमवार पासून संयुक्त कार्यवाही मोहीम होती घेण्यात आली असून 3000 हजार कर्मचारी व 150 अधिकारी संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर पहारा देणार आहे.
कोरोनाकाळात काही सामाजिक कार्यकर्ते, संस्था हे कोरोनाबधितांना रात्र – दिवस मदत करीत असताना त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे, मात्र मदत करायची असल्यास रुग्णालयातील जनसंपर्क कशाची मदत घेऊन आपले सेवा कार्य करायचे आहे कारण कोरोना वॉर्ड हा “हायरिक्स” परिसर असल्याने यामुळे त्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो मदत पोहचली की नाही त्याची खात्री मात्र संस्था अथवा सामाजिक कार्यकर्त्यांनी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.
Best collector…
Nice work sir…