अहमदाबाद राजमुद्रा वृतसेवा- गुजरात मध्ये नवे मुख्यमंत्री यांनी शपत घेतल्यानंतर लवकरच मंत्री मंडळाची स्थपना होईल अशी राजकीय शक्यता होती . मात्र मंत्रीमंडळचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सरकारची गाडी अडकली असून नाराज आमदार माजी मुख्यमंत्री विजय रूपांनीणींच्या निवासस्थानी जमा झाले आहेत .
मुख्यमंत्र्यांच्या आधी नव्या मंत्र्याचा शपत विधी होणार होता मात्र या राजकीय पेजामुळे हा शपत विधी लांबणीवर टाकण्यात आला आहे. कारण नवीन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याच्या विचारात आहेत . त्यावरून भाजपात अंतर्गत कलह निर्माण होण्यची शक्यता आहे. भाजपाच्या सूत्रांनी सांगितले कि नव्या मंत्रीमंडळातून ९० टक्के जुन्या चेहऱ्यांना हटविले जाईल आणि त्या जागी नवीन चेहेरे आणले जातील .
दरम्यान, गुजरात मंत्री मंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याने त्यामुळे आता भाजपच्या जुन्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार माजी मुख्यमंत्री विजय रूपणींच्या घरी नाराज नेते दाखल होण्यास सुरवात झाली आहे. या नाराज नेत्यांमध्ये ईश्वर पटेल,ईश्वर परमार,बच्चू खापड , वासांत आहिर , योगेश पटेल,यांचा समावेश आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आपल्या मंत्रिमंडळात नवीन चेहरे घेण्यात उत्सुक आहेत. विजय रूपांनी यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांना मंत्रिपद नाकारले जाऊ शकते. यामध्ये भाजप नेते नितीन पटेल,भूपेंद्र सिंह ,आर सी फालदू ,कौशिक पटेल,यांचा समावेश असण्याची शक्यता आहे .