औरंगाबाद राजमुद्रा वृत्तसेवा – हेल्मेट न घालणाऱ्या २२ पोलिसांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या विरोधात कठोर मोहीम सुरु केली असून वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवण्यासाठी हि कारवाई आवश्यक असल्याची सूत्रांनी सांगितले. या कारवाही दरम्यान २२ पोलिसांनाच हेल्मेट न घातल्यामुळे दंडाची पावती देण्यात आली आहे त्यामुळे कायदा हा सर्वांसाठी सामान असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
दोन दिवसापूर्वी गणेश राजपूत या पोलीस कॉन्स्टेबलच्या जालना रोड वरील एस . एफ. एस. शाळेसमोर अपघात झाला होता . असे अपघात भविष्यात टाळण्यासाठी वाहतूक शाखेने हि मोहीम सुरु केली आहे. गणेश राजपूत हे रस्त्यावरील डिव्हायडरला धडकल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर वीजा झाली दोन दिवसापासून ते बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . त्यांची प्रकृती सद्या चिंताजनक आहे . हि माहिती कळाल्यावर शहरातील सर्वच पोलिसांनी दुचाकीवर हेल्मेट वापरावे असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिले आहेत .