जालना राजमुद्रा वृत्तसेवा – मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्यातील परतूर तालुक्यातील एनोरा गावात घडली . सदाशिव शिवाजी भुम्भर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो २२ वर्षाचा होता . आरक्षण नसल्याने जीवन यात्रा संपवतोय अशी सुसाईड नोट लिहून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला. सदाशिव हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. त्याने इलेट्रीशिअन चा कोर्से केला होता मात्र मराठा आरक्षण नसल्याने पाहिजे तशी नोकरी मिळत नाही असा आरोप त्याचा होता, तसेच शेतात एवडा दुष्काळ आहे याच विवंचनेत त्याने घरातील छताला पंख्याला मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली . दरम्यान, तरुणांनी आत्महत्या करू नये असे आव्हान खाजदार संभाजी राजे छत्रपती यांनी केले आहे.