नागपूर राजमुद्रा वृत्तसेवा – पदावर राहून जर मला माझ्या ओबीसी समाजाला न्याय आरक्षण मिळवून देता येत नसेल, तर पदावर राहण्याचा उपयोग काय असा सवाल करत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी करून पदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले आहे. राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार असल्याचे तायवाडे यांनी सांगितले त्यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली आहे.
आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी मद्यमांशी बोलताना सांगितले कि या पदावर राहून माझ्याच समाजाला न्याय मिळत नसेल तर मी या पदावर राहण्यास योग्य नाही. म्हणून मी येत्या एक दोन दिवसात या पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितत आलो आहे. तत्वांची तळजोळ करू शकत नाही असेहि त्यांनी सांगितले . यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार वर निशाना साधला सद्या ओबीसींचा प्रश्न एरणीवर येऊन ठेपलेला आहे. राज्य शासन ओबीसींचे २७ टक्के आरक्षण अबाधित ठेऊ शकत नाही असेही तायवाडे यांनी सांगिलते. तसेच ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासाठी केंद्र सरकारशी संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले .