जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांच्या पराभवासाठी अनेक डावपेच आखले त्यांच्या पराभवाचे षड्यंत्र रचले होते, असा आरोप भाजपाचे चाळीसगावचे शहराध्यक्ष घुवनेश्वर पाटील यांनी केला आहे. या प्रकाराने भाजपामधील खासदार विरुद्ध आमदार यांची गटबाजी असल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात त्यांनी उन्मेष पाटील यांना पत्र लिहिले आहे. त्यात भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आमदार चव्हाण यांच्या पराभवासाठी अनेक षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. हे पत्र त्यांनी ज्यांच्यावर आरोप केला त्या खासदार उमेश पाटील यांना असलेल्याने जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या नेते कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे पक्षात आजपर्यंत जी गटबाजी असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे गटबाजीची ही गुपिते भाजपच्या शहराध्यक्षांनी उघड केली आहे. भाजपा शहराध्यक्ष कडून झालेल्या या रोपाची मुळे खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे. शहराध्यक्ष घुणेश्वर पाटील यांनी म्हटले आहे की, मी 2014 मध्ये भाजपाच्या उमेदवारीच्या बळावर व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उन्मेष पाटील हे आमदार झाले ते आमदार झाल्यानंतर चाळीसगाव शहराचे चित्र बदलेल अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र त्याचा भाग म्हणून 45 वर्षाची शहर विकास आघाडीची सत्ता संपुष्टात आणून लोकनियुक्त नगराध्यक्ष 13 नगरसेवक निवडून दिले त्यात मी देखील होतो ते म्हणाले मी 2016 मध्ये शहराध्यक्ष झालो. आपल्या नेतृत्वाखाली काम करताना आम्ही एक कार्यकर्ता जोडत होतो या दरम्यानच्या काळात आपण मात्र जुन्याजाणत्या नेत्यांना बाजूला सारत होतात 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला मोठी जबाबदारी दिली, घरच्या भाकरी खाऊन कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रचार करून प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून आणले तालुक्यात एकही दिवस प्रचारासाठी आले नसताना सामान्य कार्यकर्त्यांनी अंगावर देत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन प्रचार केला त्यानंतरच्या खासदार पाटील यांचे सर्वात जवळचे व विश्वासू साथीदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीची चर्चा होती. त्याच वेळी उन्मेष पाटील यांनी आपल्या मित्रांसाठी शिफारस करतील असे वाटले होते पण शिफारस तर दूरच आमदार चव्हाण यांच्या पराभवासाठी अनेक कटकारस्थान रचले याची चर्चा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात होती.
आपला विरोध असतानाही मंगेश चव्हाण हे निवडून आले. काळाच्या प्रवाहात तालुक्यात कधी गटबाजी दुफळी निर्माण झाली हे आम्हालाही कळाले नाही. आज आपणास सह सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार गटाचा की आमदार गटाचा असे विचारतात अशा वेळी आम्हाला कमळाचे म्हणजे भाजपाचे असे उत्तर द्यावे लागते, असे भाजपा शहराध्यक्ष घुवनेश्वर पाटील म्हणाले आहे.
आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची ताकद दिली पाहिजे होती. नुकतेच शहरात जे कोरोना लसीकरण देण्यात आले त्यात वेगळे चित्र पाहायला मिळाले पक्षात गटबाजी लपली होती फक्त चर्चेत होती ती आपण उघड केली. बॅनर छापले त्यात पक्षाचा प्रोटोकॉल एवढेच नव्हे तर लसीकरण आयोजनाच्या काही ठिकाणच्या बॅनरवर भाजपाच्या खासदारांचा विरोधी पक्षाच्या काही लोकांचे एकत्रित फोटो होते यावरून नेमके काय समजायचे या गोष्टीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मला काय पक्षाचा एकही पदाधिकारी तसेच नगरसेवकच विचारात घेतले नाही. खरे तर लसीकरणाची सुरूवात आमदार गिरीश महाजन यांनी सर्वप्रथम जामनेर मध्ये केली उन्मेष पाटील हे जिल्ह्याचे खासदार असताना लसीकरण शिबिर फक्त चाळीसगाव तालुक्यातच घेण्याचा उद्देश काय होता ? असा सवाल घुनेश्वर पाटील यांनी केला आहे. आपण करीत असलेल्या हालचालींमुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करीत आहात या पत्राने गडबड उडाली आहे.