जळगाव राजमुद्रा वृतसेवा – भारत विकास परिषद जळगाव शाखे तर्फे शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता महेश प्रगती मंडळ रिंग रोड येथे रुग्ण साहित्याचे लोकार्पण सोहळा कोविड योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खा. उन्मेश पाटील, राष्ट्रीय वित्त सचिव संपत खुर्दिया, राष्ट्रीय सचिव पश्चिम शेत्राचे सुधीर पाठक, देवगिरी प्रांत अध्यक्ष गोपाल होलानी, आ.राजूमामा भोळे, जिल्हा शल्य चिकित्सा नाभोजी राव चव्हाण ,जिल्हा राष्ट्रींय स्वंम सेवक संघ चालक डॉ.निलेश पाटील, उद्योजक रजनीकांत कोठारी आदि उपस्थित राहणार आहेत.
भारत विकास संचलित संपर्क फौंडेशन हि संस्था ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारी नोंदणीकृत संस्था असून ३० ते ३५ सेवाव्रती रोज रुग्णांचे जीवन सुसैय्य करीत आहे . तसेच अनेक डॉक्टरांनी कोविडकाळातील विलगीकरण केंद्र व कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या या संपर्क फौंडेशनच्या सेवावृतीचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे .तरी या कार्यक्रमास संबधितानी उपस्थित राहणे असे आव्हान जळगाव शाखेचे अध्यक्ष उज्ज्वल चौधरी , तुषार तोतला यांनी केले आहे .