मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा – जिल्ह्यातील यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी वादळी वारे व पूर परिस्थिती मुळे पिकांच्या झालेल्या नुकसानी सह घर पडझळ, पशु हानी , गोठे , झोपड्या, कपडे, भांडी,आदि साठीचे ७४ कोटी ८८ लाख तर २०१७ पासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गरपिठीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई पोटी प्रलंबित असणा-या १०२ कोटी ९ लाख रुपयांच्या मदत निधीचा मुद्दा आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला . जळगाव जिल्ह्यास या निधीचे ताटळीने वितरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा निधी प्रदान करण्याचे निर्देश दिले असल्याने आता जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्याना १७८ कोटी रुपयांचा मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . लवकरच हे अनुदान प्राप्त होणार असल्याने नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .
याबाबत माहिती अशी कि २०२१ मध्ये झालेला अतिवृष्टी व पूर परिस्थिती मुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. यात जानेवारी ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ३ कोटी ३४ लाख रुपयांचे अनुदान मिळाले असून ६७ कोटी ५७ लाख रुपयाचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. तर यंदाच झालेल्या अतिवृष्टी मुळे पिकांच्या झालेल्या नुकसानी सह घर पडझड आदि साठीचे ७ कोटी ३१ लाख रुपयांची मदत बाकी आहे.
यासोबत २०१७ च्या खरीप हंगामा पासून ते ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिठी मुळे झालेल्या नुकसानीच्या हानीचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. यात २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावरील बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ४३६ कोटी ४० लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात आली असून ११ कोटी ७० लाख रुपयांची मदत बाकी आहे. २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळाबाबत ४०२ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून ५० कोटी ७३ लाख रुपयांची मदत अद्याप बाकी आहे ऑक्टोबर नोहेंबर २०१९ मध्ये आलेल्या महाचक्रीवादळामुळे झालेल्या हानीचा विचार केला असता ४७९ कोटी ९३ लाख रुपयांची मदत शेतकर्यांना मिळाली असून अद्यापही ४ कोटी ३३ लाख रुपयांची मदत बाकी आहे.जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी मुळे ११ कोटी ९४ लाख रुपयांची मदत मिळाली असून ३५ कोटी ३१ लाख रुपयांची मदत अजून बाकी आहे.
अशाप्रकारे यंदाचे ७४ कोटी ८८ लाख आणि २०१७ ते २०२० च्या दरम्यान नुकसानीचे १०२ कोटी ९ लाख रुपये असे एकूण १७६ कोटी ९७ लाख रुपयांच्या मदतीचा मुद्दा ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत मांडला. शेतकर्याची अतिवृष्टी मुळे मोठी हानी झाली असल्याने हा मदत निधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करून देखील तो मिळाला नसल्यामुळे ना. पाटील यांनी लक्ष वेधले . यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह मंत्री मंडळाने आजची बिकट परिस्थिती लक्षात गेऊन जळगाव जिल्ह्यात हा मदत निधी तातळीने प्रधान करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी गुलाबराव पाटील आणि जिल्हा अधिकारी अभिजित राउत यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे .