जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा – चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उन्मेष पाटील यांच्यात सुरु झालेली भाजपा पक्षांतर्गत गटबाजी मुळे पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात चाळीसगावचे भाजपा शहर अध्यक्ष घुवनेश्वर पाटील यांनी खासदार उन्मेश पाटील यांना पत्र लिहून खळबळ माजून दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये विविद चर्चेला उधान आले आहे. आ. मंगेश चव्हाण यांच्या पराभवासाठी खा.उन्मेश पाटील यांनी अनेक षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे. जुन्या जाणत्या नेत्यांना डावलून पक्षाने दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पडली नसल्याचा आरोपही केला असल्यमुळे पक्षातील गटबाजीला उत आला आहे. या गटबाजीला मिटवून भाजपामध्ये सर्वाना एकत्रित करण्याचे मोठे आव्हान भाजप नेते माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या समोर येवून ठेपले आहे.पक्षांतर्गत असलेली गटबाजी संपविण्याचे हे आव्हान कशा पद्धतीने मिटवीतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी मध्ये सुरु असलेल्या पक्षांतर्गत गटबाजीमुळे स्वकीयांचे मोठे आव्हान आ. गिरीश महाजन यांचा समोर असून ते यातून कोणता मार्ग काढतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष्य लागून आहे. कारण यापूर्वी देखील काही किरकोळ कारणावरून गटबाजी उफाळून आली होती . तो वाद शांत होत नही तोच हा नवीन विषय चव्हाट्यावर आला आहे .
भाजपचे तत्कालीन ग्रामीण जिल्हा अध्यक्ष स्व. हरीभाऊ जावळे, उदय वाघ यांचे कार्य सर्व परिचित आहेत कारण त्यांची पकड आणि नियोजन वेवस्थित असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांना समान न्याय मिळत होता . परंतु, भाजपा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्यावर जबाबदारी आल्यापासून पक्षात अंतर्गत गटबाजीची धुडघूस सुरु झाली आहे . कार्यकर्ते व पदाधिकार्यांवर त्यांचा अंकुश राहिलेला नाही . पक्षाने दिलेली जबाबदारी घेतल्यापासून आ. भोळे यांचे संघटनात्मक कार्य राहिले नसल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. योग्य सुश्म नियोजनाअभावी कार्य त्यांचे राहिले नसल्याचा आरोप होत आहे . शहरातच आमदाराचे पाहिजे तसे विकास कामे होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. अचानक शहर आणि जिल्ह्यातून गायब होणे आणि कालांतराने प्रकट होणे त्यामुळे जनतेचा संपर्क होऊ शकत नाही.
आता नव्याने चाळीसगाव आमदारांविरुद्द खा.उन्मेश पाटील यांनी षड्यंत्र रचल्याचा आरोपामुळे भाजपमधील गटबाजीला उघडपणे राजकीय उधान आले आहे. भाजपा नेते आ. गिरीश महाजन एक सक्षम अनुभवी नेते म्हणून सुपरिचित आहेत ते हे वाद कशापद्धतीने मिटवतील याकडे पहिले जात आहे.